STORYMIRROR

Manda Khandare

Classics

3  

Manda Khandare

Classics

क्षण

क्षण

1 min
171

दुःखाच्या क्षणांना आठवतेस का तू।

सुखाच्या गोळाबेरजा करत जा तू।।


मृगजळाच्या मागे अशी धावतो का आहेस

जरा आळोशाला निवांत, बसत जा तू।।


पिवळे पान जरी गळून पडले असले।

तरी आठवणींच्या वहीत त्याला जपत जा तू।।


झाले गेले विघटित, विसरत जा तू

येणाऱ्या क्षणांचा उत्साह करत जा तू।।


आरश्यात प्रतिबिंब शोधते का असे।

मनात आठवणींची, कास धरत जा तू।।


हे शल्य जगण्याचे बोचरे जरी असले।

कट्यांना फुला परी, उरी जपत जा तू।।


हिरावून घेतले जरी सर्व काही तुझे।

पुण्याचे घडे तरी डोळे झाक भरत जा तू।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics