STORYMIRROR

Shobha Wagle

Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Classics Inspirational

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
221

कुसुमाग्रजांचा जन्मदिन माझ्या मराठीचा दिन

मूळ संस्कृतामधुनी निपजली तिला ज्ञानदेवानं

भावार्थदीपिकेचे पठण सामान्य जनमुखातून

ज्ञानेश्वरी वाचून लोकांस मिळाले गीतेचे ज्ञान.


संताच्या वाङमयाचे भांडार माझ्या मराठीत

केशवसुत, मोरोपंत, बहिणाबाई मराठी काव्यांत

कानेटकर, खांडेकर पु.ल. अशा श्रेष्ठ लेखकांनी

अफाट खजिना भरलाय मराठी साहित्यात. 


देवनागरी लिपीत, काना मात्रांच्या शृंगाराने

सजलेली मायाळू माय माझी मराठी गं.

माझ्या शिक्षणाचा श्री ग णे शाः मराठीने,

स्वर,व्यंजने व बाराखडीने उभारलाय गं.


माझ्या मराठीचा गोडवा वर्णावा किती बाई!

साध्या सोप्या अर्थाने देई विद्यार्जन सर्वांना.

देशाचे नामवंत लोक घडवली माझ्या मराठीने

आता नाही त्यांची आठवण आजच्या तरुणांना.


काय भुललास वरलिया रंगा, तसा भाळला इंग्रजीला. 

ऐपत नाही तरी पोरा घाली इंग्रजी माध्यमात

इंग्रजीमुळे संर्दभ काही लागेना पोराला

शाळेहून जास्त वेळ पोराचा जाई शिकवणीत.


मुलांची गळती भारी वाढलिया मराठी शाळांत

स्वतः नाही शिकला तरी पोरां घाली तो इंग्रजीत

पालकांनो कायम लक्षांत असू द्या, तुमच्या

शिक्षणाचा पाया मजबूत होईल तो मराठीत.


साऱ्या महाराष्ट्राची भाषा माझी माय मराठी

वऱ्हाडी, कोकणी, मालवणी, अहिराणी, 

पैलू बदलत असते ती प्रत्येक बारा मैली पण,

तिच्या गोडव्याला प्रतिस्पर्धी नाही दुजा कोणी!


आज मराठीचा दिन बाळगू तिचा बाणा 

शिवबाची शान, संताची खाण, लेखकांची

कवीचे प्राण अशा माऊलीचे करू जतन

कायम ठेवू तिला आपल्या स्वाभिमानाची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics