STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

3  

Chandan Pawar

Classics

कन्या..

कन्या..

1 min
277

लेक—अंधारमार्ग उजळणारी..

प्रकाशाची वाट चोखळणारी..

तिमिरावर विजय मिळविणारी


कन्या—ज्ञानाचे ज्ञानतेज..

अज्ञानाला दूर सारणारी..

जीवन समृद्ध करणारी...


कन्या—देवासमोरची सांजवात..

भक्तीभावाने हात जुळवणारी..

शुभंकरोती ने मांगल्य भरणारी..


कन्या—दीपोत्सवाची पताका..

सुखसमृद्धी वैभव संपन्नता..

मनातील अंधःकारही दूर करणारी..


कन्या—वंशाची वंशवृद्धी..

सोबती बनते दिव्याची...

 विश्व उजळणारी दीपज्योती.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics