STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

अवहेलना..

अवहेलना..

1 min
7

तुझ्या प्रेमाच्या दारापाशी
उभा राहिलो हात पसरून...
दोन शब्द जिव्हाळ्याचे बोल 
थकलोय तुला विनवून विनवून ...

नको चंद्र-तारे आभाळातले
नको चांदण्यांची बरसात..
तुझ्या साथीने करायचीय मला 
साऱ्या संकटावर मात...

तुझ्या नजरेच्या एका कटाक्षाने
हृदयात वादळ उठते गं...
तुझ्या एका गोड हास्यासाठी
मन माझे झुरते गं...

तू बोलत नाहीस म्हणून
शब्दही माझे अबोल झाले...
तुझ्या आठवणींच्या पावसात
स्वप्नांचे सारे गाव भिजले...

किती मागू तुझ्याकडे प्रिये
किती करू विनवणी...
तुझ्या प्रेमाच्या भीकेसाठी
फिरतोय मी बनुनी भिकारी जनी...

तुझ्या ओठांवरचे हसू
माझ्या जगण्याचे गाणे..
माझ्याशी बोलायचे नसते 
करतेस किती बहाणे..

नको करू अशी अवहेलना 
नको देऊ विरहाची शिक्षा...
तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांसाठी 
आगतिक होऊन मागतोय भिक्षा...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy