STORYMIRROR

Savita Jadhav

Classics Inspirational

3  

Savita Jadhav

Classics Inspirational

मन उनाड वारा

मन उनाड वारा

1 min
240

मन उनाड अनाड, जसा वारा वादळाचा

आता इथे मग तिथे, घेण्या ठाव आयुष्याचा


मन उनाड हे भारी, किती करिते विचार

कधी भले कधी बुरे, कधी होतसे बेजार


मन करिते कल्पना, मन चित्रेही रेखीते 

मन राहतसे ठाम, कधी चिंतीतही होते


मन उनाड हा वारा, फिरे कसा गरागरा

मन असे ते पाखरू, घेई झेप ते अंबरा.

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics