STORYMIRROR

Anju Metkar

Classics

3  

Anju Metkar

Classics

अलगुज

अलगुज

1 min
267

तव अलगुजाची धुन

करी तनामनास बेभान

संसार पाश तोडून

धावते कालिंदीतीरी मन ।।१।।


तव पाव्याची धुन

शहारे चित्त होई विचलीत मन

तुज सवीचे गुज आठवून

भेटीस्तव आक्रंदते प्रतिदिन ।।२।।


तव बासुरीची धुन

मधु नादाचे हेच गुंजन

सुखद सहवासाची आन

यमुनातटी रासक्रिडा चिंतन ।।३।।


तव मुरलीची धुन

गुंजते गोकुळी कानोकान

गोपगोपिकांसवे चेष्टामंथन

मम बावरीचे हरपते भान ।।४।।


तव वेणूनाद गहन

द्वैत अद्वैताचे मिलन

सात्म्यसुखाची प्रचिती महान

तव पादस्पर्शे गवसे कैवल्य निधान ।।५।।


हे प्रभु दयाघना

बन्सीधारी मन मोहना

तुज येवो मम करूणा

कृपावंत व्हावे ही आस वसुदेव नंदना ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics