असा कसा रे पावसा
असा कसा रे पावसा
1 min
182
असा कसा रे पावसा ,
किती घालतोस तू धिंगाणा
मिसळतो रंग स्वप्नांचे मातीत
उरतात फक्त आसवांच्या खुणा ...
कधी काळ होऊनिया येतो ,
अन् बरसतो निष्पाप देहांवर
जाती जळूनी , अंकुर आशेचे ,
फक्त राख उरे भुईवर ...
कधी तांडव करतो ,
अन् घालतो अश्रूंचे स्नान
किती ऐकू येती आर्त स्वर ,
तुला रे काय त्याची जाण ...
तुझ्या रौद्र रूपापायी ,
वाट्यास येती अगतिक क्षण
डोळ्यासमोरूनी अंतरती प्रियजन ,
पाहूनी फुटे पापण्यांचा बांध ...
आस लावूनीया बसतो ,
आम्ही सारे तुझ्या येण्याची
तोडू नको रे विश्वास ,
घट्ट होऊ दे साथ जन्माची ...