STORYMIRROR

Mitali More

Tragedy Others

3  

Mitali More

Tragedy Others

वांज

वांज

1 min
229

मोठ्या थाटात गेले

नऊ दिवस नव्याचे

नवसाच्या देवीगत 

चोचले पुरवले माझे


मग काही दिवसातच 

वंश वाढीची मांग झाली

सासू सासरे आईबाबा झाले

मी त्यांची मुलगी झाली


प्रेम असं ऊतू जात होतं

लाडाने माझं मन न्हात होत 

अशी कशी नजर लागली

जेव्हा ती बातमी सर्वांना कळाली 


रिपोर्ट माझे वाचण्यात आले

परत परत तपासण्यात आले

आईबाबा बदलून मग

परत सासू सासरे झाले


पदोपदी आठवण देत सारे

सार्यांची दोषी मीच आहे

आई बनू शकत नाही

असं डिफेक्टीव पीस आहे


स्विकार नाही माझा आता

हि काळ्या दगडाची रेघ आहे

माझ्या पापण्यांवरती आता

दाटलेले काळे मेघ आहे


काळ्या मनागत ही

काळी सांज आहे

लेकरं नव्हते मला अन

पण त्यांच मनच वांझ आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy