STORYMIRROR

Savita Kale

Tragedy

3  

Savita Kale

Tragedy

नदी

नदी

1 min
355

स्वच्छ सुंदर निर्मळ मी

नित निरंतर वाहत गेले

कृत्य मानवी कारण ठरले

दूषित आज मजला केले


रूप पुर्वीचे सुंदर माझे

हरवून मी बसले आहे

कुरूप माझ्या पात्राकडे

दुःखी होऊन पाहत आहे


मी तर नेहमी भलेच केले

जिथे जिथे मी वाहत होते

अविचारी कृतघ्न मानवा

काय माझे रे चुकले होते


दुर्दशा ही आज माझी

उद्या होईल अशीच तुझी

बदल स्वतः ला स्वतः साठी

राखण कर पर्यावरणाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy