आठवू नको..
आठवू नको..


माझ्यावर इतकं प्रेम लुटवू नको
मी तुझीच साजणा मला आठवू नको....
प्रेमाच्या वाटेवर तुला अडथळे येतील
गोड बोलून तुझा गळा कापून जातील
मला तू आठवणींच्या गावी पाठवू नको.....
प्रेमात काही नाही फक्त दुरावाच मिळतो
ज्याचा जीव जातो त्याला दुरावा छळतो
सख्या साजणा मी तुझा श्वास सतावू नको.....
माझ्यासाठी कधीच तू अश्रू गाळू नको
प्रेमात त्रास होईल तू होऊ व्याकुळ नको
तू माझाच स्वतःला फाशीवर लटकवू नको.....