STORYMIRROR

Anita Gujar

Tragedy

3  

Anita Gujar

Tragedy

ऋण झाले डोईजड

ऋण झाले डोईजड

1 min
164

लग्न करण्या लेकीचे

ऋण बाप तो काढितो

लेक नांदण्या सुखात

सारे वेठीस लावितो ||१||


मुले होण्या सुशिक्षित

मायबाप काढी रीण

शिक्षणाच्या खर्चापायी

त्यांची झीजते वहाण ||२||


पीक काढण्या शेतात

ऋण शेतकरी काढी

अवकाळी पाऊस हा

जप्ती घरावर धाडी ||३||


ऋण काढुनिया कुणी

घर बांधीतो हक्काचे

फिटताच ऋण सारे

दिस येतील सुखाचे ||४||


हाव संपता संपेना

ऋण झाले डोईजड

मनावर ओझं त्याचे

जगणेही अवघड ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy