Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anita Gujar

Tragedy

3  

Anita Gujar

Tragedy

पाऊलखुणा

पाऊलखुणा

1 min
416


जीवनाच्या वाटेवर चालताना पाहतो क्षणभर मागे

माहीत असूनही मन 

धावे मृगजळामागे,


माझ्या जीवन वाटेवरती

दिसे कित्येक पाऊलखुणा

सुख-दुःखाच्या पाऊलखुणा

प्रेम विरहाच्या पाऊलखुणा,


काही शेवटपर्यंत साथ दिलेल्या

तर काही मधुन सोडून गेलेल्या,

प्रत्येकजण महत्वाचे

प्रत्येकाचे वैशिष्ट्य आगळे,


काही वळणावर असे सोबतीला

तर दुसऱ्या वळणावर नाहीशा झालेल्या,

काही पाऊलखुणांबरोबर मी भरकटलो,

काही पाऊलखुणांबरोबर सावरलो,


आयुष्याच्या मध्यान्हावर भेटे वेगळ्याच पाऊलखुणा,

आजही आहेत सोबतीला

माझ्या पावलांना साथ द्यायला,


शोधतो मी त्या पाऊलखुणा 

ज्यांनी जीवनाला अर्थ दिला,

सुखाचा मज परामर्ष दिला,

पण नियतीपुढे काय कोणाचे चाले,


अचानक गायब झाली ही पाऊले,

विसरू म्हटले तरी येत विसरत नाही,

थोडे अंतर चालून मन मागे वळून पाही,

जो पर्यंत मला नवीन पाऊलखुणा नाही भेटणार

जुन्या पाऊलखुणा मज आठवत राहणार


तुजसवे जीवनाला अर्थ लाभला

जीवनप्रवास तुजविन भासे सुना

माझ्या पावलांना साथ द्याया

शोधते तुझ्या पाऊलखुणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy