STORYMIRROR

Anita Gujar

Others

4  

Anita Gujar

Others

माय माऊली

माय माऊली

1 min
384

पक्षिणीचे चित्त नित्य 

राहे पिलापाशी

बाळ जागता रात्रंदिन

माय माऊली झोपे कशी||


काट्याकुट्या जमवुनी 

खोपा तो बनविला,

तान्ही पिले त्यात ठेवुनी 

जीव झाडाला टांगला||


तळहाताचा पाळणा 

केला जोजाविता तान्हा,

वात्सल्याचा फुटला उरी 

गोड अमृताचा पान्हा||


अशा माय माऊलीच्या

ओठावर मृदू साय,

वंदावे त्रिवार येथे

या माऊलीचे पाय||


Rate this content
Log in