Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anita Gujar

Others

3  

Anita Gujar

Others

जाग तू रणचंडिके

जाग तू रणचंडिके

1 min
394

अत्याचारी जाळ्यातून

मुक्त हो सखे, बालिके

नाश कर दुर्जनांचा

जाग तू रणचंडिके ||१||

नको बोलावूस कृष्णा

जरी आला दुःशासन

नारी बन तू सबला 

कर स्वतःचे रक्षण ||२||

कर संहार तू त्याचा

नको होऊस निवस्त्र

ममत्वाची रक्षा कर

लढ घेऊनिया शस्त्र ||३||

कलियुगी रामायणी

सीता नको दुर्गा बन

बदलूनी वेष कधी

दारी आलाच रावण ||४||

टाक छाटूनी मुंडके

वासनांध राक्षसांची

जाग तू रणचंडिके

वेळ आली लढण्याची ||५||

अत्याचारी नराधमी

क्रूर त्या लिंगपिसाट

नांगी वेळीच ठेचून

कर तू भुईसपाट ||६||

जाळूनीया मेणबत्त्या

सुखावले जरा मनी

फिरे श्वापद मोकाट

सल सलते जीवनी ||७||

भारी पडे ग साऱ्यांना

सखे नसे तू अबला

जाग तू रणचंडिके

बनूनिया तू सबला ||८||

Rate this content
Log in