STORYMIRROR

Anita Gujar

Others

3  

Anita Gujar

Others

स्वप्न माझे

स्वप्न माझे

1 min
246

तूच स्वप्न माझे

तूच माझा स्वर्ग

तुझ्यातच शोधीला 

जीवनाचा या मार्ग ।।


सोडोनिया सर्व काही

आलो तुझ्याच ठाई

स्पर्शाने तुझीया फुलली

या देहाची वनराई ।।


तुझ्या संगतीत जडले

हिऱ्यास जसे कोंदणे

गहिऱ्या डोळ्यात हसले

टिपूर पूनव चांदणे ।।


हृदय मंदिरी पुजली

तुझीच नित्य मूर्ती

साऱ्या मनोरथांची

झाली माझ्या पूर्ती ।।


सागरी मनी उठले

आज खुशीचे रंग

मम संसारी भेटला

मज सावळा श्रीरंग ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन