STORYMIRROR

Anita Gujar

Others

4  

Anita Gujar

Others

वसंत प्रीतीचा

वसंत प्रीतीचा

1 min
792

शिशिर पानगळ तळ

जीव कासावीस झाला

निसर्गाची बघा किमया

गुलमोहर फुलून आला||१||


कोवळे हे कोंब हलकेच

डोकावी बघा नकळतच,

नवलाईच्या हिंदोळ्यावर

वसुंधरा झुले सहजच ||२||


गानकोकीळा गाते मंजुळ

गेली कुठे सांगा हिरवळ

पटमधलं पाणी झुळझुळ

या धरतीचं रूप आगळ ||३||


वृक्ष लता नटून सजल्या

ओल्या चिंब दवात भिजल्या,

आठवणी ज्या मनी रुजल्या

डोळ्यातूनी वाहू लागल्या||४||


रंगरूप बघ बदलला

माझ्यासवे या सृष्टीचा

सख्या भेटणार म्हणोनी

फुले वसंत प्रीतीचा||५||


Rate this content
Log in