STORYMIRROR

Anita Gujar

Others

4  

Anita Gujar

Others

ओवी

ओवी

1 min
364

माहेरच्या वाटे सुख

वाट पाहे माय खूप

लागेना तहान भूक

माझीया माहेरी गं||१||


कोंबडं ते आरवता

चहूकडं उजाडता

सडा रांगोळी घालता

तुळस मी पूजीते||२||


माहेरच्या वाटेवरी

मना कसे मी आवरी

डोळा देखे ना जो वरी

मुख गं माऊलीचे||३||


माझ्या माहेरची वाडी

भोवताली दाट झाडी

मला कशी भूल पाडी

मना तो थारा नाही||४||


माऊलीचे खुले दार

मला सय येते फार

बाप माझा तालेवार

मन सुखाने डोले||५||


दारापुढे तो पळस

लेक वाड्याचा कळस,

जणू दारीची तुळस 

लाडकी लेक माझी||६||


Rate this content
Log in