प्रेमरंगी आज दोघं रंगूया
प्रेमरंगी आज दोघं रंगूया
सप्तरंगाची उधळण करूया रे
ये प्रेमरंगी आज दोघं रंगूया रे।।धृ।।
तुझ्यासाठी आले तुझीच मी झाले
प्रेमासाठी मन तुझ्या आसुसले
मनातील भाव डोळ्यांनी जाणले रे
ये, प्रेमरंगी आज दोघं रंगूया रे।।१।।
मिटता दुरावा गाठभेट झाली
स्वप्नांची गोष्ट आज फळास आली
भासले मला जणू स्वर्ग लाभला रे
ये प्रेमरंगी आज दोघं रंगूया रे।।२।।
विश्वास आपला कधी ना ढळावा
तुझा माझा सूर कायम जुळावा
रंगासंग एकरूप होऊया ना रे
ये प्रेमरंगी आज दोघं रंगूया रे।।३।।

