STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

सांग कितीदा हरावे?

सांग कितीदा हरावे?

1 min
757

स्मरता तुला वाटे पुन्हा, तुझ्याचसाठी झुरावे

वेड्या मनाने तुझ्यासाठी, सांग कितीदा हरावे?


किती कळल्या किती अबोल राहिल्या, भावना मनातल्या

माझ्या असूनही तुझ्या जाहल्या, प्राजक्तकळ्या हृदयातल्या

गीत गाऊन बोलावती कधी, स्पंदनेही माझी तुला

सरेल कधी हा क्षणिक दुरावा, स्वप्नी पुन्हा सांग मला

तुझ्या स्वप्नीच्या हिंदोळ्यावर, तुझ्या सोबत झुलावे

वेड्या मनाने तुझ्यासाठी, सांग कितीदा हरावे?


एक वाट रंगीत सुमनांची,जाते माझ्या घरापासुनी

बहर तेथला वितुष्ट होऊन, उदास वाटे तुझ्यावाचुनी

स्वप्नसदनी माझ्या मनीच्या, ये तू ही स्वप्नांतूनी

धुंद होऊनी प्रत्येक पहाटे, तुझी वाट पाहतो मनापासूनी

रिक्त मनीचे अमृतप्याले, तुझ्या प्रीतीने भरावे

वेड्या मनाने तुझ्यासाठी, सांग कितीदा हरावे?


येईल ओठी तुझ्याही, आपल्या आठवणींचे गाणे

बोल घेतील तुझ्या सुरातून, भविष्याचे तराने

होईल या नगरातून, जेव्हा तुझे जाणे

भेटतील आपोआप तुला, आपल्या भेटीसाठी बहाणे

तोवर वाटे तुला श्वासांच्या, एकांती स्मरावे

वेड्या मनाने तुझ्यासाठी, सांग कितीदा हरावे?



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance