STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

3  

Sakharam Aachrekar

Others

किरणांसवे पहाटेच्या...

किरणांसवे पहाटेच्या...

1 min
664

किरणांसवे पहाटेच्या रोज तुझी आठवण येते


गुंततो मी प्रतिमेत तुझ्या, रूप तुझे घेण्या दर्पणा सांगूनी

हरवतो मनी तुझ्या कल्पनेच्या, कधी सोबती तुला घेऊनी

सजवितो क्षणांना सरलप्रीतिने, तुझ्या सावलीच्या छटी रंगूनी

रम्य सांज ती आठवतो कधी, कातरवेळी तुला बिलगुनी

गणित दिसाचे सुटत नाही अन रात्र अनामिक सुरू होते

किरणांसवे पहाटेच्या रोज तुझी आठवण येते...


ओढ मनाची नित्य ओढते, देहाला या तुझ्याकडे

सांगून कितीदा निष्फळ ठरती भाव माझे तुझ्यापुढे

वाहतो आज या अबोल प्रीतिला, माझ्या मनीची हृदयफुले

हिंदोळ्यावर या आभासी, माझी जीवननाव झुले

स्वप्नात जातो दिवस तुझ्या, मग स्वप्नीच तुझी साद येते

किरणांसवे पहाटेच्या रोज तुझी आठवण येते...


तार्‍यांच्या प्रकाशातून तुझ्यापर्यंतचा, प्रवास सुरू झाला

वाटेवर त्या माझ्यासह, तुझ्या श्वासांचा गारवा आला

साक्षीदार आपल्या मीलनाचा, तो उनाड चंद्र झाला

एकांत आपणा देऊन हळूच, एका ढगाआड गेला

उधळीत हे स्वप्न रम्य मग सकाळ माझी होते

किरणांसवे पहाटेच्या रोज तुझी आठवण येते... 


Rate this content
Log in