STORYMIRROR

vanita shinde

Romance

3  

vanita shinde

Romance

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

1 min
301

रेशमासम केसात माळलास

तू सुगंधी फुलांचा गजरा

स्तब्ध होऊनी पाहती कशा

या मंत्रमुग्ध बेधुंद नजरा..


टपो-या नयनात भरलेस

सखे तू काळेभोर काजळ

पाहूनी तुजला मन माझे

नकळतच झाले घायाळ..


गालावरची खळी तुझ्या

गोड दिसते हसता खुदकन

ओठावरची लाली वाटते

जणू बहरलेलं सुंदर बन..


दिसते खुलून सखे तुझ्या

भाळी गोजिरी चंद्रचकोर

रूप पाहूनी भारावलो मी

नाचू लागला मनीचा मोर..


कोमल कांती नाजूक तन

निर्मळ असे निरागस मन

सौंदर्यात तुझ्या गेलो हरवून

वाटते घ्यावे प्रेमरसात न्हाऊन..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance