STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

भाव माझ्या नजरेतले

भाव माझ्या नजरेतले

1 min
257

वेदना या अंतरीच्या

मनी तूझ्या उमलतील का

भाव माझ्या नजरेतले

तुला कधी कळतील का ||0||


तूझ्या वेदनेच्या पुराला

हास्याचे बांध घालतोय

चेहऱ्यावर झळकण्याआधी

नजरेचा कटाक्ष टाळतोय

माझ्या डोळ्यातील अश्रू

नयनी तुझ्या तरळतील का

भाव माझ्या नजरेतले

तुला कधी कळतील का ||1||


ध्यास एक तुझाच आहे

तुझेच स्वप्न पाहतो मी

मैफिलीत असलो तरीही

फक्त एकटाच राहतो मी

या ओढीच्या संवेदना

हृदयी तुझ्या वळतील का

भाव माझ्या नजरेतले

तुला कधी कळतील का ||2||


भेटण्याची ओढ राहते

देखाव्यास्तव खोटे बोलतो

प्रेमात तुझ्या मी हरवून जातो

कधी कधी मी माझाच नसतो

तूच माझे प्रारब्ध मग

नशिबाच्या वाटा उजळतील का

भाव माझ्या नजरेतले

तुला कधी कळतील का ||3||


तूच आहेस वर्तमान माझा

तूच आहेस माझे प्रारब्ध

व्यक्त कशा करू भावना

अपुरे आहेत सारे शब्द

माझ्या हृदयातील भावना

हृदयी तूझ्या सळसळतील का

भाव माझ्या नजरेतले

तुला कधी कळतील का ||4||


कधीतरी तु वळून जरा

प्रेमाने मला बघशील का

कासावीस झालाय जीव माझा

कधी माझी होशील का

भिंती तूझ्या माझ्यातील

हळूच कधी ढळतील का

भाव माझ्या नजरेतले

तुला कधी कळतील का ||5||


काय घडतंय कळत नाही

एक वेगळंच जग थाटलंय

कवेत घेतलंय आकाश आता

प्रेमाचं क्षितिज गाठलंय

झऱ्यासारख्या प्रेमभावना

ओसंडून खळखळतील का

भाव माझ्या नजरेतले

तुला कधी कळतील का ||6||


तुला मिठीत घेऊन सखे

क्षण हळवे कुरवळावे

माझ्या मनातील प्रेम प्रिये

तुला न सांगता कळावे

उचंबळून भावना या

कधीतरी उसळतील का

भाव माझ्या नजरेतले

तुला कधी कळतील का ||7||


Rate this content
Log in