मनाला मिळालं....
मनाला मिळालं....
अगं तुझ्यामागं मन पळालं
कसं प्रेम झालं काही ना कळालं...
रोज तुला स्वप्नात पाहिलं
माझं ना काही माझं राहिलं
तुझ्या आठवणीकडं मन वळालं....
गोड किती तुझं सावळं रूप
तुझ्यापुढं परी वाटे कुरूप
माझं मन तुझ्या मनाला मिळालं....
साधी भोळी तू गं राणी
तुझी माझी अनोखी कहाणी
तुझ्यासाठीच माझं प्रेम गळालं....

