STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

प्रेमाची कबुली

प्रेमाची कबुली

1 min
474

प्रेम करायचे ठरवले

पण त्याकरता प्रेमासाठी काय हवंय मला

आवडला मज तो

पण त्याला मी आवडायला हवे


नजर होता त्याची आणि माझी

वाटला मला तो पडला प्रेमात माझ्या

भेट ठरली त्याची नि माझी

उत्कटता लागली शिगेपरी


पहिल्या भेटीत वाटला त्याला काहीतरी द्यावा

वाचलं मी कुठेतरी फूल देताना आधी घायाळ व्हावं लागतं

माझ्या प्रेमाची धगधगती आग

नकळत त्याच्या हृदयात जागवावी लागेल


भेटला मज तो ठरल्यावेळी

धडधड वाढवी माझ्या हृदयावरी

मी प्रेमाची कबुली देण्याआधीच

त्याने होकार दिला माझ्या प्रेमाचा

काय म्हणून सांगू आनंद गगनात मावेनासा झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance