आत्मा
आत्मा
माझ्या निर्जीव जिवाला आत्मा मिळाला
तुला भेटलो माझा नवस पूर्ण झाला...
तुझा जीव माझा जीव एक झाला
तुझा हात माझ्या हातात आला
जशी कुणाला धनदौलत मिळते
तसा मला तुझा साथ मिळाला...
तुझी एक झलक पाहणं प्रार्थनेसारखं
तुझं माझ्यापासून दूर जाणं यातनेसारखं
तुझ्या तिरक्या नजरेनं असा इशारा केला
माझ्या हृदयाला तुझा ठोका मिळाला...
जन्माचं तू सोबत जोड नातं
मी प्रेमाचा दिवा तू बन माझी वात
तू माझी देवी तुझी पूजा करीन
तुझा ध्यास करण्याचा बहाणा मिळाला...

