मंजूर
मंजूर
साजणी मी प्रेमात मजबूर आहे
जा तू मला तुझा दुरावा मंजूर आहे.....
लिहीतो मी रोज तुझ्यावर किती गीतं
डोळ्यात आहेत अश्रू शब्दात तुझे मितं
माझ्या जिवाला लागली तुझी हूरहूर आहे......
सहन कसा करू तुझा हा वेडा रुबाब
पुस्तकांत ठेवलेला आज रडतो गुलाब
प्रेमात पाहिलेलं स्वप्न डोळ्यापुढे चूर आहे......
मला वाटे मी जगात तुझ्यासाठीच आलो
विसरलो जग मी तुझ्या आठवणींत मेलो
माझ्यापेक्षा जास्त राणी तुझं प्रेम चतुर आहे.....

