आनंदाची उधळण
आनंदाची उधळण
1 min
240
ढोल ताशांच्या वाद्याने
करू स्वागत तयारी
आनंदाची उधळण
अंगी चैतन्य संचारी ।
येई भादव्यात बाई
माझ्या गणेशाची स्वारी
मूषकास घेवोनिया
बाप्पा येईल हो घरी ।।
ओवाळून पंचप्राण
तुज औक्षण करते
सुखी संसारास माझ्या
एक मागणे मागते ।।
केली आरास ही छान
लाडू नैवेद्याचा थाट
तुला बसायला देते
बाप्पा चांदीचा रे पाट ।।
बाप्पा संकटी धावतो
गौरी नवसास पावे
विघहर्त्या गणराया
तुला शरण मी यावे ।।
झाले वाजत गाजत
गणेशाचे आगमन
यावे सर्वांनीच घरा
देते तुम्हा आमंत्रण ।
