STORYMIRROR

Anita Gujar

Others

4  

Anita Gujar

Others

साल सरलं सरलं

साल सरलं सरलं

1 min
326

सुख दुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं ll धृ ll


आनंदाची उधळण करीत दूत सोनेरी आलं

मरगळ झटका सांगे ही घटका नूतन वर्ष उदेलं 

राग सोडुनी माफ करण्या मन करा हो थोरलं

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं ll १ ll


शुभचिंतन अन् अभिनंदन करूया परस्परांचं

गोफ गुंफूनी मैत्रीचा बांधू तोरण भावफुलांचं

माणसातील माणुसकी माझ्या मनानं हो हेरलं

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं ll २ ll


संस्कृती अन् संस्काराचा जपुया अमूल्य ठेवा

लाभो सुख समृद्धी सर्वा हेच दान मागूया देवा

ईशकृपेने मजला आज काव्य हे स्फुरलं

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं ll ३ ll


समाधान हीच धनसंपदा देई मनस्वी आंनद

श्वासामधुनी दरवळावा स्नेहाचा कस्तुरी सुगधं

संकटावर मात करुनी दुःख मागे हो सारलं

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं ll ४ ll


समजून घेऊ मनमनाच्या प्रेमाची परिभाषा

एकजुटीने घालू गवसणी जीवनी विनाशाला

भावपुष्पाचे बीज माझ्या हृदयात पेरलं पेरलं

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं ||५||


Rate this content
Log in