STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

तेंव्हा जिवनाची खरी लज्जत कळते

तेंव्हा जिवनाची खरी लज्जत कळते

1 min
181

कटू अनुभव चाखता चाखता

प्रेमाची एखादी गोड डिश मिळते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते

दुःखाची गणितं मांडता मांडता

अलगद सुखांची बेरीज मिळते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते ||0||


सुखं दुःखं ही

कूस बदलतंच असतात

कधी प्रेमवर्षाव, तर कधी दुःखाची धूळ

उधळतंच असतात

येणारा प्रत्येक क्षण

जाण्याची दिशा घेऊनच येतो

दुःखात सुख, सुखात दुःख

हळुवारपणे पेरूनच येतो

दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होऊन

कळत नकळत डोळ्यात अश्रू तरळते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते ||1||


अति प्रेमाचे साईड इफेक्ट्सही

दुःखच देतात

दुःखाला न घाबरणारे शेवटी

कॅशमध्ये सुखच घेतात

प्रत्येक स्वप्न

कधीच खरं होत नसतं

कधी अनपेक्षित खरं होतं

कधी प्लॅनिंग केलेलं फसतं

दुःखाची रात्र मावळता मावळता

सुखाची कळी हळूच उमलते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते ||2||


पझेसिव्ह रहाल तर

दुःखच हाती येईल

नात्यात जो मोकळीक देईल

तो आदर भरभरून घेईल

कोणाच्याही दुःखाचं कधीच

आपण कारण नसावं

प्रत्येकाच्या हृदयात फेविकॉलसारखं

चिकटून बसावं

ज्यांच्यावर प्रेम करावं त्यांची नजर

आपल्याकडे वळते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते ||3||


निराशेच्या गर्तेत जगण्याला

जगणं कसं म्हणावं

का उगाच दुःख कुरवाळत

दिवसरात्र कण्हावं

ग्रहण तर सूर्यालाच लागतं

ताऱ्यांना लागत नाही

तुमचं नशीब प्रयत्नांशिवाय

दुसरं काहीच मागत नाही

ध्येयप्राप्तीकरता रक्तात

चेतना सळसळते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते ||4||


वेदना ह्या सर्वात

महान शिक्षक असतात

तुमची सहनशक्ती वाढवणाऱ्या

कणखर रक्षक असतात

प्रत्येक जखम काहीतरी

शिकवून जाते

तुमची सहनशीलता अगदी अलगद

पिकवून जाते

तुमच्या नजरेत जेंव्हा तुमची

अधीरता सलते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते ||5||


कोणाच्या तरी मनात

आपल्याबद्दल आतुरता असावी

कोणाच्या तरी हृदयात

आपली प्रतिमा वसावी

मुखवटे हास्याचे धारण केले तरी

जगणं सजा आहे

एकटंच जगणं जीवन

यात काय मजा आहे

जीव जडलेल्या व्यक्तीचे हृदय

आपल्यासाठी हळहळते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते ||6||


जीव जडलेल्या व्यक्तीला मिठीत घेऊन

खूप रडावसं वाटतं

हृदयात दाबलेलं प्रेम ओसंडून

व्यक्त करावंसं वाटतं

कळत नकळत कोणावर

अफाट जीव जडतो

दिव्याच्या वातीसारखा हा जीव

क्षणोक्षणी फडफडतो

आपलं काळीज बनलेली व्यक्ती

आपल्यावर जीव ओवाळते

तेंव्हा जिवनाची खरी

लज्जत कळते ||7||


Rate this content
Log in