माझे हे हृदय तुझे...
माझे हे हृदय तुझे...
माझे हे हृदय तुझे
तुझे हे रूप
तुला पाहून रे
प्रेमा येतो हुरूप...
मनी दाह विरह
तो सहवासा
चिंब झाले मी
तूच मज हवासा...
नुसते मिळवणे
ना कान्हा बाधा
दूरूनही वाटता
विश्वास आहे राधा...
चौफेर प्रेमलाली
बहरे श्वास
सांज हवीशी
ही मिलनाची आस...
पेटती श्वास बंध
तो वेडापिसा
आरक्त डोळे
हा बावरलेला ससा...
लाजरी झुळूक येते
ही स्वप्नवेली
सांज सावळी
येते बनून लाली...
प्रेमाच्या सीमेपुढे
सुखब्रह्मांड
ती मनसोक्त
अग्नी डोह ओलांड...

