STORYMIRROR

Jyoti Ahire

Others

3  

Jyoti Ahire

Others

प्रवास...

प्रवास...

1 min
298


मला आवडे प्रवास

रेल्वे कधी स्कुटी, बस

विंडोसिट मनभावे

छान दिसे सृष्टि खास


झाडवेली पाही छान

रस्ते पळे वेग खास

धावणारे परिसर

यात रमण्याची अास


पक्षी घिरट्या ही घाली

रेस लागे वाहनांची

सायकल, या मोटारी

मज्जा वाटे फिरण्याची


पायवाट आवडते

बुटं रस्तेही तुडवे

रस्ता हा पायवाटेचा

वाटेवर धुळ उडे


चहा रस्त्याच्या कडेचा

प्रवासात कंफर्ट हा

जोडीदार मजा याची

मना शांती प्रवास हा


लाॅंगड्राव्ह मला भावे

सोबतीला पतीदेव

पाणी वगैरे असते

सारे हो गाडीत जेव


वणी सप्तश्रृंगी घाट

मस्त हा चढउतार

प्रवासात नामजप

माझा भक्तीचा सार


केला प्रवास काश्मिरी

येते मज्जा लई भारी

सारा बर्फाळ हा भाग

स्वच्छ शुद्ध हवा सारी


माहेरचा प्रवासही

मन प्रफुल्ल असतं

इथे आराम असतं

काम दु:खाचं नसतं


Rate this content
Log in