सत्संग(अभंग)
सत्संग(अभंग)
इश्वरास भेटी। इश्वर साधना।।
खुषी उपासना। पुजाअर्चा..।।..१
सत्य या वचना। इश्वराची प्राप्ती।।
आनंदाची प्राप्ती। नामजप।।..२
हे साधने साठी।नामजपा टप्पा।।
इश्वराच्या गप्पा। हे सत्संग..।।..३
जपनाम वाढे।संख्यात्मक वाढ।।
गुणात्मक वाढ। साधकाला..।।..४
साधने विषयी । ही दिशादर्शन।।
देवाचे दर्शन। ब्रम्हतत्व..।।..५
अध्यात्म असणे।देवळात जाणे।।
तीर्थक्षेत्री जाणे।धर्मक्षेत्र..।।..६
साधक सानिध्य।संताकडे येणे।।
गुरूकडे जाणे।हा सत्संग..।।..७
सारे विश्व माझे।देवळात येणे।।
तीर्थक्षैत्री जाणे।
आध्यात्मिक..।।..८
लाभते सत्संग।संपते दुर्गुण।।
होतात सज्जन।ज्योती म्हणे..।।..९