STORYMIRROR

Jyoti Ahire

Others

3  

Jyoti Ahire

Others

रम्य सांजवेळी...

रम्य सांजवेळी...

1 min
324

रम्य सांजवेळी झोंबतो गारवा

सायंकाळी जीवघेणारा मारवा


निजतात झाड-वेली अशावेळी

उमलती भावगंध ही कोवळी


भासे संपले प्रीतीचे उपवास

खुले मुक्या मनी अंतरी विश्वास


परतली खोप्यात अंगणी पक्षी

तुझ्यासाठी सजली सांजची नक्षी


मधाळली संध्या प्रेमगंध पहा

निसर्गाची ही किमया रम्य अहा


पहा येईल नभी तारका, चंद्र

देवलोकातून पाहतो तो इंद्र


Rate this content
Log in