प्रवास...
प्रवास...
साहित्याचा प्रवास.
अवघड भारी..
अवखळ शब्दसारी.
अक्षरांची घालमेल.
कधी बिचारी...
कधी शौर्यवंत सारी.
धाडसी, आक्रमक.
कधी काव्य विवीध प्रकार.
कधी नुसतीच कवीता.
गझल-बिझल.
बर्याच कथा, कादंबर्या.
आवडती चारोळ्या!
सोप्या शब्दांच्या गोळ्या?
शब्द औषध!
शब्द विष!!
अलंकारीत शब्द प्रवास.
कानी अमृत सांडे.
प्रवास साहित्य कृष्णलिला.
अजून बरच काही.
प्रवास चांगला वाईट.
ग्रंथ,पोथी,पुराणं..
खुपकाही.......
आमच्या सारखे नवोदय प्रवासी,,,,
साहित्यप्रेमी..!
खडतर प्रवास...
हवाहवासा ध्यास.
साहित्य सम्मेलनी,,
टाळ्यांचा कडकडाट.
कधी उपहास.
कधी विश्वास.
आवडतो साहित्य प्रवास..
हा साहित्य प्रवास!!!