सखा...
सखा...
1 min
387
तू आणि मी आपण दोघे
वेगळे आहोत का सांग ना?
तुझ्याशिवाय अधुरी मी
माझं जगणं शून्य कसं जगू बोल ना?
तूच सखा तूच सोबती
तूच माझा परमेश्वर तूच ऐक्य
तूच माझा विश्वास राजा
तुझ्याशिवाय जगणे अशक्य
नेहमी तू सोबती असतो
तू फक्त नि फक्त माझा आहेस
शोभते बघ आपली जोडी
तूच माझा जीव अन् प्राण आहेस
तुझ्या संगतीनं दुनिया कळाली
तुच मार्गदर्शक माझा
सर्व परिस्थितीत असतोस सोबती
कसल्याही प्रसंगी आहेस माझा
आवडते रंग ऋतूचेही सारखेच
शुभेच्छा देतो सर्वांना जोडीने
सण-वार असो वा दुःखद घटना
असतो सदैव सखा "मोबाईल" सोबतीने
