“माझ्या मना..”
“माझ्या मना..”
मी आवरावे मना तूला अन्
तू पुन्हा निसटावे अलगद असे,
गुंफता गजरा उमलत्या कळ्यांचा
हलकेच पाकळीने निखळावे जसे..
साठवावे तू क्षण अगणित अन्
काठोकाठ भरावे अंगण असे,
आठवून क्षण एकेक सारे
आकाशी खुलावे चांदणे जसे..
जुळावे नाजूक धागे कधी अन्
अलवार जपावे तू काळजांत असे,
अवचित सांडून पानावरूनी
रूजावे दवबिंदु मातीत जसे...

