प्रेमाचं नाणं...
प्रेमाचं नाणं...
छापा पडताच मी तुझी होणार
काटा पडताच तू माझा होणार....
घेऊन हातात मी प्रेमाचं नाणं
मारू नको काळजावर बाण
मी तुझी कुठे नाही जाणार....
तुझ्यासाठीच मी सजते सवरते
होशील तू कोणाचा मी घाबरते
तुझाच साजणा मी हात धरणार....
तुझ्या प्रेमासाठीच मी जगते
तू हसावं म्हणून मी रडत असते
तुझ्याच नावाचं मी कुंकू लावणार....

