STORYMIRROR

Raakesh More

Tragedy Others

3  

Raakesh More

Tragedy Others

स्वातंत्र्याचा अर्थ ?

स्वातंत्र्याचा अर्थ ?

1 min
240

रिकाम्या उपाशी पोटाला 

दोन घासांची आस आहे 

आजही भुकेने फडफडतो 

गरिबांचा श्वास आहे ||0||


स्वातंत्र्याचा नेमका अर्थ 

आजही उमजत नाही 

मूठभर धनिकांच्या हाती का गेलं 

हेच समजत नाही 

झोपडीत इथं दिवाही नाही 

बंगल्यांना दिव्याची आरास आहे 

आजही भुकेने फडफडतो 

गरिबांचा श्वास आहे ||1||


धर्माचं राजकारण 

सत्तेसाठी फायदेशीर ठरावं 

यांना सुरक्षा रक्षकांचे कडे 

जनतेनं दंगलीत मरावं 

सत्तालोलूप मनांना फक्त 

खुर्चीचा हव्यास आहे 

आजही भुकेने फडफडतो 

गरिबांचा श्वास आहे ||2||


आजही उपेक्षित दलितांचा 

समाज आहे 

आजही मनुवाद्यांना 

चातुर्वर्णाचा माज आहे 

पोखरलीत मनं जातीयवादानं 

बाहेरून सारं झकास आहे 

आजही भुकेने फडफडतो 

गरिबांचा श्वास आहे ||3||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy