STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे

1 min
123

नाही कोणी तुमच्या आयुष्यात प्रेमर्षावास्तव

व्हॅलेंटाईन डे ची कमी इतर नात्यांनी भरता

नात्यांची नात्यांशी तुलना का करता

कशाला जीव घालवता आणि कशाला मरता ||0||


प्रत्येक नात्याचं दुखणं वेगळं आहे

प्रत्येक नात्याची मजा वेगळी आहे

प्रत्येक नात्याची अनुभूती वेगळी आहे

प्रत्येक नात्याची सजा वेगळी आहे

भरून नाही काढू शकत एक नातं

तुमच्या दुसऱ्या नात्याची कमतरता

नात्यांची नात्याशी तुलना का करता

कशाला जीव घालवता आणि कशाला मरता ||1||


आईचं प्रेम प्रेयसी कडून मिळत नाही

प्रेयसीचं प्रेम मातृप्रेमाशी जुळत नाही

प्रत्येकाची एक जागा आहे ठरलेली

प्रत्येक जमिनीत एकच फुल फुलत नाही

नात्यांचं alternative शोधताना खरं तर

तुम्ही तुमच्या मनात गंभीरपणे हरता

नात्यांची नात्याशी तुलना का करता

कशाला जीव घालवता आणि कशाला मरता ||2||


नात्यांना एकमेकांत मिक्स करू नका

तुमची अक्कल पाजळून फिक्स करू नका

सर्वच नात्यांना पुनर्जन्म नसतो

प्रत्येक नात्याचा फिनिक्स करू नका

एका नात्याला दुसऱ्या नात्याचा गोड

ऑप्शन समजून दुसरीकडे का सरता

नात्यांची नात्याशी तुलना का करता

कशाला जीव घालवता आणि कशाला मरता ||3||


व्हॅलेंटाईन डे त म्हणे माता पिता गुरु येतात

बहिणीच्या प्रेमालाही अक्कलशून्य जागा देतात

नात्यानात्यातलं प्रेम वेगळं आहे मित्रा

नको तिथे हे वेडे लोकांचं ध्यान नेतात

रिक्त जागेत मित्रा तेच नातं बसतं

दुसऱ्याच वेगळ्या नात्याची मान का धरता

नात्यांची नात्याशी तुलना का करता

कशाला जीव घालवता आणि कशाला मरता ||4||


Rate this content
Log in