STORYMIRROR

Samruddhi Articles chanel

Tragedy

3  

Samruddhi Articles chanel

Tragedy

बाबा......

बाबा......

1 min
324


बाबा गेल्यावर आयुष्य सारे अंधार आहे.......

हे सागरा  तुझ्यातही सामावणार नाही

एवढा मोठा   दुःखाचा सागर  माझ्या मनात आहे!

कधी डोळ्यातून तर कधी मनात वाहती अश्रू धारा  

कधी न संपणारे हे वादळ बाबा गेल्यानंतरचे आहे !

रात्र ती अमावाशेची  वाटावी किती भयावह  काळी

पण यापेक्षाही अंधारलेले दुखाने माझे मन आहे !

तीमिरात कुठे  हरवले वात्सल्य तयांचे

शोधू कुठे मी आता केवळ हा जगण्याचा  भास आहे !

बाबा बाबा म्हणणारे मन आजही मानत नाही ते गेल्याचे

आजही डोळ्यात वाहणारा आसवांचा पूर आहे!

सोप असत दुनियेला हे म्हणणं कि सावर स्वतःला पोरी

पण हे कधीच न सावरणार दुखावलेले मन आहे !

कठीण होऊन जातं आयुष्य जेव्हा आठवण बाबांची येते

पण आता स्मुती तयांच्या माझा जीवनाची नावं आहे!

सहज कळत नाही दुनियेला प्रेम बाबाचे

ज्यांच्या कडे आहे हे प्रेम  तो  सर्वात धनवान आहे!

राहावे सदैव प्रेम बाबाचे सदैव राहावी हि सावली

कारण बाबा  गेल्यावर आयुष्य सारे अंधार आहे !            


Rate this content
Log in

More marathi poem from Samruddhi Articles chanel

Similar marathi poem from Tragedy