॥ विरह वेदना ॥
॥ विरह वेदना ॥
सागराला येते उधाण भरती
नदीलाही येतो पुर
दुर जरी तु क्षणभर गेली
मनात उठते काहूर
तुझ्या असतांना सहवासात फुलली फुले
हिंदोळ्यावर झुलता झुलता मनही झुले
स्वप्नांचा तो बांधला बंगला
क्षणाक्षणाला भासला
तो क्षण मिठीत चांगला
क्षणात तु माझ्यापासून दुर गेली
नाही जमत एकटे रहाणे
जीव हा नकोसा झाला
करतो वेडे बहाणे
जन्मांतरीची तु साथ देणार
घेतली होती आण
रुसून निघुन गेली तु
मनाचे गळून पडले पान ॥
