STORYMIRROR

archana dhawad

Romance Tragedy

3  

archana dhawad

Romance Tragedy

जरा मागे वळून बघ....

जरा मागे वळून बघ....

1 min
598

आयुष्याच्या सांजवेळी परत एकदा, 

ते जुने दिवस आठवून बघ ना रे

परत एकदा पडू प्रेमात, 

जरा मागे वळून एकदा बघ ना रे


घट्ट झालेल्या आठवणींचे ते धागे, 

परत एकदा उकलून बघ ना रे

परत एकदा गुंफू नव्याने, 

जरा मागे वळून एकदा बघ ना रे


तो आपला रुसवा, तो फुगवा, 

ती लुटुपुटीची भांडणे विसरलास रे

परत एकदा रुसायचं मला, 

जरा मागे वळून एकदा बघ ना रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance