प्रेमगीत
प्रेमगीत
तुझ मधाळ बोलणं
माझ्या मनाला भावलं..!
सोज्वळ तुझा स्वभाव
मनात प्रेमगीत वाजलं..!!
प्रिये माझ्या मनाला
वेड तुझ ग लागलं..!
या जन्मात मी तुला
सात जन्मासाठी वरलं..!!
जिवापाड प्रेम माझं
तुझ्या मनाला कळलं..!
मिठीत तुझ्या सखे
माझं स्वप्न रंगलं..!!
तुला निरपेक्ष प्रेम
करून हृदयात जपलं..!
तुझ माझ्या आयुष्यात
येणं भाग्य समजलं..!
तूच मला प्रेमात
जगायला शिकवलं..!
सोडू नकोस साथ
तुजपाशी मागणं मागितलं..!!

