तुझ्याशिवाय जमत नाही
तुझ्याशिवाय जमत नाही
एक दुवा आहेस तू माझ्या लेखणीचा,
पण तुला पाहता शब्द का फुटत नाही?
रोज नव्याने जगण्याचा प्रयत्न करतो,
तुझा दरवळ माझ्यातला काही सुटत नाही..
आठवणीत तुझ्या मन रमते माझे,
स्वप्नात ही बघ तुझ्याशिवाय पर्याय नाही..
प्रत्येक भेटीला भेट तुला गजरा असतो,
सावरून ही स्वतःला, तुझं लाजणं काही लपत नाही..
वांझ ढग ही गाळती अश्रू विरहाचे,
तुझ्यासाठी रडणारा फक्त मीच नाही..
रोज का 'सागर' आठवण काढतो तिची?,
तीच पण तर माझ्याशिवाय मन कशात रमत नाही..

