STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Romance

4  

सागर_ एक अथांग मन

Romance

मी आहेच जरा असा..

मी आहेच जरा असा..

1 min
568

मी आहेच जरा असा.. निःशब्द राहणारा..

तुझं नाव ऐकलं की तुझ्यात रमणारा..


बोलक्या चेहऱ्यांमध्ये एकटा फिरणारा..

न बोलताच माझ्यातल्या तुला मांडणारा..


कधी किनाऱ्यावर संथपणे भरकटणारा..

तुझ्याइतकंच त्या लाटांवर प्रेम करणारा..


कवडशासारखा फक्त तुझ्यावर पडणारा..

त्या सावल्यांमध्ये नकळत तुला शोधणारा..


मी आहेच जरा असा.. तुझ्यात सामावणारा..

तुझी वाट पाहत स्वतः चातक होणारा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance