STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Others

4  

सागर_ एक अथांग मन

Others

असं वाटतं पुन्हा एकदा

असं वाटतं पुन्हा एकदा

1 min
469

असं वाटतं पुन्हा एकदा..

त्याच आठवणीमधे गुंतून जावं..

असं वाटतं पुन्हा का होईना..

एकदा नव्याने जगून पहावं..


असं वाटत पुन्हा एकदा..

स्वतःमध्ये हरवून जावं..

नेहमी का असेना..

हसणं कधीच न विसरावं..


अस वाटत पुन्हा एकदा..

वाऱ्याची झुळूक व्हावं..

नाजूक हळुवार का होईना..

हृदयाला स्पर्शून जावं..


अस वाटत एकदातरी..

तुला मन भरून पहावं..

त्या अथांग सागरात व्हावून..

तुझ्याचसाठी परतावं..


अस वाटत पुन्हा एकदा..

निखळ निरागस हास्य व्हावं..

दुःखाला कधीतरी विसरून..

जगणं आनंदाने जगावं..


सर्व काही मागे सारून..

फक्त तुलाच न्याहाळवावं..

दुःख, नैराश्य, असो..

तुझ्यातच मन रमवावं..


Rate this content
Log in