STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Romance

3  

सागर_ एक अथांग मन

Romance

आठवणींच्या बाजारातून..

आठवणींच्या बाजारातून..

1 min
11.8K

ओंजळ भरून सांडत चालली आहेस,

तूच का ग आज सारखी भासत आहेस..

अश्रू नेहमी पाझरले कधी दुःखातून कधी कवितेत,

पण दुःख ना कधी वेचले तू पसरलेल्या त्या शांततेत..

ओल्या मनाची पालवी त्या कागदावर फुलावी,

कवितेतली पहिली ओळ तूझ्या नावानेच लिहावी..

वाळूवर रेखाटलेलं तुझं नाव, त्या लाटेने का पुसावं,

सागराचे पाणी अलगद जाता त्या किनाऱ्याने का रुसावं..

रात्री छळलेल्या तुझ्या आठवणी, मन तसं रमत नाही,

भेटीची ओढ असतानाही, वाट ती सापडत नाही..

तुझ्यावर लिखाण वेड लावते मजसी,

नजर ही लागते मग तुझ्यासारखीच त्या शब्दांसी..

आठवणींच्या बाजारातून तुझेच स्वप्न मी वेचलेली,

माझी कविता आहेस तू.. पहाटे पहाटे सुचलेली..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance