STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Others

4  

सागर_ एक अथांग मन

Others

मला पाहू दे

मला पाहू दे

1 min
403

आज अशीच काही स्वप्ने..

तुझे रंगवू दे..

आज अशीच काही ओढ तुझी..

भासवू दे..


हल्ली नसलेले भास ही,

तुझीच चाहूल देऊन जातात..

आज अशीच सोबत तुझी,

स्मरणात ठेवू दे..


नको ते सारे वाहिलेले,

डोळ्यातून सांडलेले..

आज हसू फक्त आणि फक्त,

तुझ्या ओठांवर असू दे..


कित्येक काटे रुतले आहे,

वाटेवरती ह्या..

जखमांचा शौक तसा, 

जुनाच आहे हा..

आज त्या काट्यांवरचं गुलाब,

मला पाहू दे..


Rate this content
Log in