STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Romance

4  

सागर_ एक अथांग मन

Romance

वाटते तुला भेटावे..

वाटते तुला भेटावे..

1 min
23.5K

अबोल असलेले हे ओठ आज खूप काही बोलू पाहतायेत..

डोळेही या क्षणी समोर फक्त तुलाच मागतायेत..


ओठ जरी बंद केले तरी मन काही बोलू लागतं..

दवात फुललेल्या त्या कळीसाठी फुलपाखरू जसं व्याकुळ होतं..


आठवणी होत्या काल ज्या आजही तशाच आहेत..

नवं फक्त ते पाझरलेले डोळ्यातले थेंब आहेत..


एकांत असलेल्या जगात या तुझीच ती गर्दी आहे..

एकांतातल्या कविता त्या अन मन मात्र दर्दी आहे..


वाटते तुला भेटावे त्या अमुक अशा ठिकाणी..

वारा आणि आपण याखेरीज तिथे नसावे कोणी..


हे असं सततचं वाटणं आता कुठवर बेतलं जाणार..

तुझ्या माझ्या भेटीसाठी किती कविता नकळत होणार..

किती कविता नकळत होणार..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance