STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Romance

3  

सागर_ एक अथांग मन

Romance

तुझ्यावर लिहीन म्हणतोय...

तुझ्यावर लिहीन म्हणतोय...

1 min
301

कविता तुझ्यावर लिहीन म्हणतोय,

होशील माझी या आशेने...


प्रत्येक पानांवर कोरेन म्हणतोय,

माझ्याच लेखणीच्या साक्षीने...


शब्दांचा डाव मांडेन म्हणतोय,

तुझ्या होकाराच्या जोरावर...


कागद, पेन संपवेन म्हणतोय,

कधी लिहिण्यासाठी वाळूवर...


प्रेमात असं गरजेचं असतं का,

व्यक्त होण्यासाठीच लिहिणं-बिहिणं...


की त्या पलीकडे फक्तच उरेल,

कधी अर्धवट कविता, कधी माझं पाहणं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance